Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणेकरांवर शेअर ट्रेडींगचे जाळे पसरतेय

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

३ घटनेत ६० लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांकडून पुणेकरांना वेठीस धरले आहे. अवघ्या काही दिवसांत तुम्हाला जादा परतावा मिळवून देण्याचे लालस लाखो रूपयांची फसवणूक झाल्यानंतर थांबले जात आहे. मागील काही महिन्यांपासून पुण्यातील बहुतांश भागातील नागरिक ट्रॅपमध्ये अडकले आहेत. विशेषतः पोलिसांकडून सातत्याने आवाहन करूनही अनेकजण आमिषाला बळी पडत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तर फ्रेशर पार्टी आयोजकांचा परवाना रद्द करू; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा – सविस्तर बातमी 

स्टॉक ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ३१ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २६ मे ते २७ जून कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन लुटीचा डाव अवघ्या एका महिन्यांत साधल्यानंतरही सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे आणखी रकमेची मागणी केली होती. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला १४ लाख ९० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना ९ ते २६ मे कालावधीत वडगाव शेरीत घडली आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय नागरिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या १७ दिवसांत सायबर चोरट्यांनी संबंधिताला भुरळ पाडून त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना रक्कम गुंतवणूकीला प्रवृत्त केले. जवळपास १५ लाख रूपये वर्ग करून घेतल्यानंतरही त्यांच्याकडे सायबर चोरट्यांनी अधिकची रक्कम मागितली होती. फसवणूकीबाबत नागरिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्इ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.

मुंढवा परिसरात राहणार्‍या जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडींगचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर तब्बल १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ जुलै ते ११ ऑगस्ट कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कुटूंबियासह मुंढव्यात राहायला असून, सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर ट्रेडींगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना भुरळ पाडून विश्वास संपादित केल्यानंतर ऑनलाईनरित्या १५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींगच्या आमिषाला बळी पडू नका

जादा परताव्याच्या आमिषाने नागरिकांकडून आयुष्यात कमावलेली रक्कम सायबर चोरट्यांना वर्ग केली जात आहे. त्यामुळे अनेकांना मानसिक विकाराने ग्रासले आहे. मात्र, तरीही हाव कमी होत नसल्याचेही दिसून येत आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत चालले असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने फसवणूक झालेल्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×