Breking News
राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देशपुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दापाश, आरोपीला अटकएल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात योग्य नियोजन करा-तालुका कृषी अधिकारीपार्टटाईम नोकरीचे आमिष पडले ६ लाखांनापुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याफुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीड

विजयस्तंभ अभिवादनासाठी उच्चांकी गर्दी होणार – राहुल डंबाळे

विजयस्तंभ अभिवादनासाठी उच्चांकी गर्दी होणार - राहुल डंबाळे

पोलीस विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा होणार वापर

marathinews24.com

पुणे – कोरेगाव भीमा युद्धातील शहीद झालेल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यामध्ये यावर्षी उच्चांकी गर्दी होईल अशी खात्री समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.

अजरामर मराठी गीतांचा सुरेल नजराणा पुणेकरांना समर्पित – सविस्तर बातमी 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अनुयायांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात येत असून त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. समाज माध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे नागरिकांमध्ये उत्साह संचारला असून जास्तीत जास्त लोक अभिवादनासाठी येणार आहेत अशी माहिती डंबाळे यांनी यावेळी दिली.

उत्सव यशस्वी व्हावा व अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती, पोलीस, जिल्हा परिषद , सार्वजनिक बांधकाम, पीएमपीएमएल, महसूल विभाग यासह विविध विभागांचे २२ हजार पेक्षा अधिक कर्मचारी अत्यंत मनोभावे काम करत आहेत. आंबेडकरी चळवळीकडून या कर्माचारी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून साजरा होणारा आंबेडकरी चळवळीचा देशातील एकमेव उत्सव असल्याने याबाबत प्रशासनाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे अशी देखील भावना डंबाळे यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून अभिवादन केलेले असल्यामुळे या ठिकाणी आपणही अभिवादन करायला हवे हीच सकारात्मक भावना सर्व अनुयायांमध्ये आहे तसेच पोलीस विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करत समाजकंटकांवर व समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या नकारात्मक पोस्टवर होत असलेल्या कारवाईमुळे उत्सवावर कोणताही तणाव यावर्षी जाणवत नाही व याचा संपूर्ण फायदा उत्सवाला मिळत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात येत असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×