Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

जत मध्ये नगराध्यक्ष पद खुले; राजकीय आखाडा तापणार

जत मध्ये नगराध्यक्ष पद खुले; राजकीय आखाडा तापणार

नगरपरिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद खुले

marathinews24.com

सांगली – (रेवण कोळेकर) : जत नगर परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे खुले झाले आहे. यामुळे राजकीय आखाडा जोरात तापण्याची शक्यता आहे. आजपर्यंत नगरपरिषद निवडणुकीत किंगमेकर ची भूमिका बजावणारे नेते यावेळेस स्वतः किंग बनण्यासाठी नगरपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानले जात आहे.

राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर – सविस्तर बातमी 

राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत निघाली असून, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद खुले झाल्याने आगामी निवडणुकीत मोठी रंगत व चुरस पाहावयास मिळणार आहे. जत नगरपरिषद निवडणुकीत आतापर्यंत ‘सुरेश शिंदे’ गटाला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. नगरपरिषद स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पर हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते, या निवडणुकीत सुरेश शिंदे गटाचे रवींद्र साळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले. यावेळी सुरेश शिंदे व माझे आमदार विक्रम सिंह सावंत गटाच्या शुभांगी बन्नेनवर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पद खुले झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर यांचे पती अशोक बन्नेनवर, भाजपकडून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक स्त्री रोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ताड या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी जोरदार असल्याची चर्चा आहे.

आज वरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुरेश शिंदे यांनी नेहमीच ‘किंगमेकर’ ची भूमिका पार पाडली होती, परंतु आता नगराध्यक्ष पद खुले झाल्याने सुरेश शिंदे स्वतः किंग बनण्यासाठी आखाड्यात उतरणार का, याकडेही सर्व नागरिकांचे व नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×