Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला अखेर पूर्णविराम! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला अखेर पूर्णविराम! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय; प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या पुढाकाराने बैठकीचे नियोजन

रूपाली चाकणकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश – भूपेंद्र मोरे यांची माहिती

दिल्ली – नवले पूल व परिसरात सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात होते. या गंभीर व अत्यंत संवेदनशील प्रश्नावर अखेर निर्णायक तोडगा निघाला असून, आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठकीत नवले पुलावर तातडीने एलिव्हेटेड ब्रिज उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

पुणे पोलिस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती – सविस्तर बातमी 

प्रदेशाध्यक्ष  सुनीलजी तटकरे यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे बळी आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सविस्तरपणे मांडण्यात आला.

या संपूर्ण विषयासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आजच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत एलिव्हेटेड ब्रिजची मागणी आग्रहीपणे मांडण्यात आली. यावर नितीनजी गडकरी साहेब यांनी तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला तातडीची मंजुरी दिली. तसेच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले.

संबंधित विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना गांभीर्यपुर्वक लक्ष देऊन लवकर कार्यवाही करण्याबाबत नितीनजी गडकरी यांनी सुनावले व त्यानुसार आजच तातडीची बैठक घेऊन त्वरित प्रस्ताव सादर करावा यासाठी त्यांनी निर्वाणीची सूचना दिली.

सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या विषयासाठी सातत्याने आंदोलने, निवेदने व प्रशासनाशी संघर्ष करत हा प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, आहे. जनतेसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या भूपेंद्र मोरे यांना या त्यांनी केलेल्या विविध आंदोलनाचे यश मिळाले आहे.

बैठकीत सर्व प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून एलिव्हेटेड ब्रिजच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन नितीनजी गडकरी यांनी दिले. त्यामुळे नऱ्हे, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, वारजे तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बैठकीस सुनीलजी तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे, निलेश चाकणकर, तसेच सोमनाथ शेडगे उपस्थित होते.

या संवेदनशील प्रश्नावर तातडीने निर्णय घेतल्याबद्दल भूपेंद्र मोरे यांनी नितीनजी गडकरी, सुनीलजी तटकरे आणि रूपाली चाकणकर यांचे जाहीर आभार मानले. जनतेसाठी काहीतरी करू शकलो याचे निश्चित समाधान आहे..ह्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार असल्याचे भूपेंद्र मोरे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×