३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला
marathinews24.com
पुणे – बनावट चावीने फ्लॅट उघडून चोरट्यांनी २ लाख रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख १४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील आशरफी मस्जिल इमारतीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात वेगवेगळ्या अपघातात पादचारी ज्येष्ठांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील आशरफी मस्जिल इमारतीत राहायला आहे. २२ मे रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास महिला कामानिमित्त बाहेर गेली होती. त्याचवेळी चोरट्यांनी बनावट चावीने तक्रारदार महिलेचा फ्लॅट उघडून आतप्रवेश केला. घरातील दोन लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. महिला बाहेरून आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करीत आहेत.