Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड

एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड

३ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनांचा दरवाजा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तुंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून ३ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून तीन लाख रुपयांचे कपडे चोरून नेण्यात आल्याची घटना सोमवारी (५ जानेवारी) घडली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांंनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाईप, दोन दुचाकी, चोरलेला एक लॅपटाॅप, कपडे असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एम. जी. रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपायुुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदीप उकीरडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×