दोघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – ग्रामपंचायतीच्या मुळ दस्ताऐवजामध्ये खोटया व बोगस इतिवृत्ताचा समावेश करुन शैक्षणिक संस्थेची मिळकत व १ हेक्टर जमिन परस्पररित्या दुसऱ्या संस्थेच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी संस्थेच्या अध्यक्षसह ग्रामपंचायत सदस्यविरुध्द वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढव्यात पावणेदहा लाखांचे मेफेड्राेन जप्त – सविस्तर बातमी
रोहिदास उंद्रे (अध्यक्ष गुरुकुल एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन मांजरी) आणि विकास उंद्रे (ग्रामपंचायत माजी सदस्य मांजरी खुर्द) यांच्यासह ६ जणांवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष मोरे रा. राजगुरूनगर यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२० मध्ये घडली आहे. मार्च २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत मांजरी खुर्द याठिकाणी विशेष ग्रामसभा झालेली नसतानाही, आरोपींनी संबंधित ग्रामसभा झाल्याचे दाखवले. ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजामध्ये फेरफार करीत खोट्या दस्तऐवजाचा समावेश केला. शंभु महादेव ट्रस्ट अण्णासाहेब मगर विदया मंदीर, मांजरी खुर्द या शैक्षणिक संस्थेची मिळकत व १ हेक्टर जमिन हि परस्पर गुरुकुल एज्युकेशन अन्ड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन मांजरी यांच्या नावाने केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.