Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची १० कोटींची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासह चार ते पाच जणांची १० कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष केदारनाथ सुरवसे (वय ४८, रा. बी. टी. कवडे रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रफुल्ल जैन उर्फ प्रमोद प्रकाश माहेश्वरी, सोनिया माहेश्वरी, गौरव उर्फ गर्वित प्रमोद माहेश्वरी, हर्ष माहेश्वरी (सर्व रा. नेलर रस्ता), देवीसिंग पुरोहित , संकेत मुतगेकर (दोघेही रा. धानोरी), सोनिया उर्फ कशिश जोधानी, पंकज पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कर्जबाजारी झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. नातेवाईकाच्या मदतीने त्यांची आरोपींशी सप्टेंबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. आरोपींनी सुरवसे यांच्यासह मित्रांना गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून ‘लर्नोवेशन इंडिया’ या ट्रेडिंग एज्युकेशन फर्ममध्ये तीन कोटी २५ लाख २८ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरवसे यांच्यासह त्यांच्या मित्रांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी आतापर्यंत चार ते पाच णांची १० कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तपास करत आहेत.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रफुल्ल जैन उर्फ प्रमोद प्रकाश माहेश्वरी हा फरार आहे. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत चार ते पाच जणांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×