Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कर्जबाजारी झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून घरफोडी

४८ ताेळे सोन्याचे दागिने लांबवून पसार झालेला गजाआड

marathinews24.com

पुणे – सोसायटीतील सदनिकेतून ४८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असलेली तिजोरीच चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली.

कुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ हट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर – सविस्तर बातमी

घरफोडी करण्यापूर्वी चोरट्याने दुचाकी चोरली. वाहन क्रमांकाची पाटी काढून पसार झालेल्या चोरट्याचा पुण्यासह बार्शी, सोलापूर, धाराशिव, परांडा भागात शोध घेण्यात आला होता.रोहित विलास अंधारे (वय २५, रा. भांडगाव, ता. परांडा, धाराशिव, सध्या. रा, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंधारे हा एका खाजगी रुग्णालयात एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून नोकरी करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. कर्जबाजारी झाल्याने त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले.

हडपसर भागातील सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून अंधारेने १८ मे रोजी ४८ तोळे सोन्याचे, तसेच चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून याप्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. तपासात वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी पोलिसांना आढळून आली होती. याच दुचाकीचा वापर करून आरोपीने घरफोडी करुन पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. १७० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. धाराशिव, भूम, सोलापूरसह विविध भागात शोधमोहीम राबिविली. गुन्हे शाखेच्या पथकाने सलग २३ दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच अन्य माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि दुचाकी जप्त केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, सी. बी. बेरड, पोलीस कर्मचारी बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, अमोल सरतापे, विनायक येवले, मनोज खरपुडे, जहाँगीर पठाण, श्रीकांत दगडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×