Breking News
एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणी

हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर

हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर

‘पाणी वाचवा’ ही मोहीम सुरू करण्याची गरज – माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर

marathinews24.com

पुणे – भारतीय जीवनशैली पर्यावरण पूरक असून, आपण सर्व प्राणीमात्रांची, वृक्षांची पूजा करणाऱ्या देशातील लोक आहेत. झाडे टिकवण्यासाठी जुन्या काळातही लोकांनी बलिदान दिले आहे. दरम्यान, पाणी वाचवा ही मोहीम सुरू करण्याची गरज आहे. पाण्याची बचत करा, अन्यथा भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

पाणी हे भूमीत मुरवले पाहिजे. त्यामुळे त्याचा भूगर्भातील साठा वाढण्यास मदत होणार आहे, असे मत माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. गंगोत्री होम्सच्यावतीने आयोजित पर्यावरण दिन पुरस्कार समारंभ एम इ एस सभागृहात पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी मेधा ताडपत्रीकर, अनिकेत लोहिया उपस्थित होते.

संतांच्या पालखी सोहळ्यांना आधुनिकेचा साज…पारंपारिकता टिकवत टेक्नॉसेव्हीमुळे झाले बदल – सविस्तर बातमी 

जावडेकर म्हणाले, सौर ऊर्जा आता सगळीकडे वापरण्यात येत आहे. भविष्यात ते फायदेशीर ठरणार आहे. तसेच हिंदुस्थानने विविध क्षेत्रात आपले लक्ष्य गाठण्यासाठी विशेष प्राधान्य देत आहे. हिंदुस्थानात १९६५ साली प्लास्टिक आले असून, जे प्लास्टिक गोळा केले जात नाही, त्याच्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. दरम्यान, धुळीचे वादळ निर्माण होत असून, त्याबाबत आम्ही नियमावली केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच बांधकामावेळी राडारोडा टाकण्यासाठी सगळ्यानी जबाबदारी घेतली पाहिजे.

ही चळवळ कायमस्वरूपी सुरू ठेवली पाहिजे. जनेतच्या सहभागातून स्वच्छ भारत योजनेमुळे फायदा झाला आहे. कचरा सफाई कामगारांना सहभागी करून घेतल्यास साफसफाई चांगली होते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेल्वे असून, तेथील स्वच्छता वाखाण्याजोगी आहे.

नवी दिल्लीतील पर्यावरण भवन आदर्श बनवली असून, तेथे सौर ऊर्जा निर्मिती केली आहे. प्रत्येक फिरणाऱ्या वस्तूवर वीज निर्मिती करण्यात आली आहे. सरकार आणि जनतेने दररोज एकमेकांना पूरक काम करणे आवश्यक आहे. दरम्यान, नवी दिल्लीमध्ये मेट्रो कामामुळे ४४ हजार झाडे कापली होती. मात्र, त्यावेळी ५ लाखावर झाडे लावण्यात आली होती. आज त्यापैकी साडे चार लाख झाडे मोठी झाली आहेत,असेही जावडेकर यांनी सांगितले.

रुद्र संस्थेद्वारे प्लास्टिकपासून इंधन व त्याची यंत्रे बनवण्यासाठी महत्वाचे काम करणाऱ्या मेधा ताडपत्रीकर यांना गंगोत्री होम पृथ्वी पुरस्कार २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझा कचरा माझी जबाबदारी हीच भूमिका घेऊन आपण कामे केल्यास फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

मानवलोक अंबेजोगाई बीड या संस्थेच्या माध्यमातून पाणी विषयावरील महत्त्वाचे काम करणारे अनिकेत लोहिया यांना गंगोत्री होम्स जल पुरस्कार २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोहिया म्हणाले, आपल्यावर आपत्ती आली पाहिजे त्याशिवाय परिस्थितीचे भान आपल्याला कळत नाही. बीड जिल्ह्यात ऊसतोड मजूर ज्यावेळी स्थलांतर करतात, त्यावेळी त्यांच्या घरातील वृद्ध नागरिकांची खाण्याची खूप तारांबळ होते, असे त्यांनी सांगितले. मकरंद केळकर यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top