Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल चोरणारे अटकेत

दिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल चोरणारे अटकेत

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्यांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. प्रकाश देवराम परिहार (वय २९, रा. लाेहियानगर), मोहम्मद मनान जमाल शेख (वय २५, रा. मार्केट यार्ड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंदिराजवळ दिंडी आली होती. दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोबाइल परिहार आणि शेख यांनी लांबविले.

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर – सविस्तर बातमी 

गस्त घालणाऱ्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुनीता नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शेख आणि परिहार यांना पकडले. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. दरम्यान, पालखी सोहळ्यात दर्शन घेणाऱ्या महिलांकडील दागिने चोरल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक आणि खडकी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ६८ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बोपोडी चौकात श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी गर्दी झाली होती. गर्दीत पालखीचे दर्शन घेणारया महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. पालखी सोहळ्यात आणखी एका महिलेचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. पोलिसंनी साध्या वेशाताली पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गावर तैनात केला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×