Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात गणपती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त वाहतूक बदल

पुण्यात गणपती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त वाहतूक बदल

चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त खरेदीसाठी मध्यवर्ती भागात नागरिकांकडून गर्दी केली जाते. त्यापार्श्वभूमीवर दि. २५ ते २७ ऑगस्ट कालावधीत मध्यवर्ती भागातील वाहतूक बदल केला आहे. प्रामुख्याने शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवला जाणार असून, वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. तसेच प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणूका काढतात. त्यामुळे वाहतूक बदलास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी केले आहे.

अनुसूचित जाती, जमातींच्या लाभार्थ्यांसाठी दुधाळ जनावरे वाटप योजना – सविस्तर बातमी 

शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात ‘श्रीं’ची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. कसबा पेठेतील डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ, जिजामाता चौक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात गर्दी होत असल्यामुळे वाहतूक बदल केला आहे. गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद आहे. चालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणार्‍या चालकांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटल्याने चालकांनी वाहने लावू नयेत.

मुर्ती खरेदीसाठी आलेल्यांना वाहन पार्किंगची ठिकाणी

मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन २७ ऑगस्टला वाहतूक बदल केला आहे. कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजुला वाहने लावण्यास परवानगी आहे. महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकाच्या दक्षिण बाजूला वाहने उभी करावी. टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता, मंडईतील मिनर्व्हा आणि आयर्न पार्किंग तळ, शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी) ते राष्ट्रभूषण चौकादरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहन उभी करण्याची परवानगी आहे.

पीएमपीएल बसेसचे मार्ग बदलले

शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणार्‍य पीएमपीएल बसच्या मार्गात बदल केला आहे. संबंधित बसेस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. तर महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणार्‍या बस जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने मार्गस्थ होतील.

या रस्त्यावर अवजड वाहनांना २४ तास वाहतूक बंदी

शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, गणेश रस्ता परिसरात २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर कालावधीत वाहतूकीसाठी २४ तास बंदी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×