Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पालखी सोहळा प्रस्थाननिमित्ताने शहरात वाहतूक बदल

रविवारी मध्यरात्री नंतर बदल करण्यात येणार

marathinews24.com

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (२२ जून) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा प्रस्थान सोहळ्यानिमित्त रविवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे. पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. रविवारी पहाटेपासून पोलिसांकडून वाहतूक बदल केला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्या नाना-भवानी पेठेतून लष्कर भागात येणार आहेत. तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने हडपसर गाडीतळपर्यंत एकत्रित जाणार आहेत. गाडीतळ येथून सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड येथे रविवारी सायंकाळी मुक्कामी पोहोचणार आहे.

तुकाराम महाराज पालखी यांची हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर येथे मुक्कामी जाणार आहे. मध्यरात्री दोननंतर टप्याटप्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वाहतुकीस बंद असणारे रस्ते

– संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, मोरओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन) सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडीमशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत )

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×