Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी वाहतूककोंंडी

पुण्यात रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी वाहतूककोंंडी

पोलिसांकडून ठेकेदांविरुद्ध कारवाईचा इशारा

marathinews24.com

पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, मलनिस्सारण वाहिनीचे कामे सुरू आहेत. महापालिकेच्या ठेकेदारांकडून ही कामे करण्यात येत असून, संबंधित कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे न केल्यास ठेकेदारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला आहे.

दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक; ८ दुचाकी हस्तगत – सविस्तर बातमी 

शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, तसेच मलनिस्सारण वाहिनीची कामे सुरू आहेत. भूमिगत गॅस वाहिनीचे काम काही भागात सुरू आहे. महापालिकेने संबंधित कामे ठेकेदारांना दिली आहेत. ठेकेदारांनी ही कामे वेळेत करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात शहरातील वेगवेगळ्या भागात खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंडी झाल्याचे वाहतूक शाखेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

शहरातील वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. खोदकाम सुरू असल्याने योग्य पद्धतीने वाहतूक नियोजन झाले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. ही बाब गंभीर आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत. रस्ते पु्न्हा सुस्थितीत करण्यात यावेत. ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना नोटीस बजावून कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना द्यावी, असे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी नमूद केले.

खोदकामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीची संख्या

जानेवारी – १३
फेब्रुवारी – २५
मार्च – १२

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×