Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

ड्युटीवर असलेल्या ट्राफिक पोलिसांना केली मारहाण, वर्दीही फाडली

वर्दीही फाडली, कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी आरोपी ताब्यात पुण्यातील उंड्री चौकातील घटना

marathinews24.com

पुणे- वाहतूक नियमनासाठी उंड्री चौकात ड्युटीवर तैनात असलेल्या दोन पोलीस पोलिसांवर एका व्यक्तीने हल्ला करत मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणत त्याने कर्मचार्‍याला शिवीगाळ केली. त्यानंतर एका पोलिसाला झापड मारून दुसर्‍या अमलदाराच्या शर्टची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेश लक्ष्मण कदम (वय ४०) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याला पोलीस अमलदारांनी समजावून सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्याने पोलिसांवरच हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यात १० वर्षात पहिल्यांदाच खुणांचे प्रमाण घटले – सविस्तर बातमी

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, उमेश राजू दाभेकर हे मागील तीन वर्षांपासून कोंढवा ट्राफिक विभागात कार्यरत आहेत. १ एप्रिलला ते अशोक म्हस्के यांच्यासोबत उंड्री चौकात ड्युटी करीत होते. त्यावेळी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ऑटोचालकाने पोलिसांना शंकर मंदिराजवळ एकजण लोकांना शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. तसेच पार्क केलेल्या दुचाकी रस्त्यावर ढकलत आहे, त्यामुळे वाहतूक अडथळीत होत आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिले असता, एकजण मंदिराजवळ असलेल्या दुचाकींचा लाथ मारून रस्त्यावर पाडत होता. परिसरातून जाणार्‍यांना मोठ्याने ओरडून शिवीगाळ करत होता. पोलिसांनी वाहने बाजूला करण्यास सुरुवात केली असता त्या व्यक्तीने संतापून कॉन्स्टेबल उमेश दाभेकर यांचा कॉलर पकडूनन त्यांच्या गालावर झापड मारली.

पोलीस कॉन्स्टेबल अशोक म्हस्के यांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांचाही कॉलर पकडली. त्याने दोघा पोलीस अमलदारांना ढकलून जीवे मारण्याची धमकी दिली. झटापटीत दोघा पोलिसांच्या गणवेश खराब झाला.अमलदार उमेश दाभेकर यांच्या शर्टाची दोन बटणे आणि नेमप्लेट तुटली, तर अशोक म्हस्के यांच्या ड्रेसची उजव्या खांद्याची पट्टी फाटली. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन कालेपडले पोलीस ठाण्यात नेले. चौकशी दरम्यान आरोपीने गणेश लक्ष्मण कदम (वय ४०) असे नाव सांगितले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×