Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती जनसंवादासाठी १३ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

त्रिभाषा धोरणावर सर्वांचा सहभाग; समितीचा पुणे दौरा १३ नोव्हेंबरला

marathinews24.com

पुणे – राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती या अनुषंगाने विभागनिहाय भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. १३ नोव्हेंबर, २०२५ रोजी पुणे येथील झुंबर हॉल, विधानभवन कौन्सिल हॉल येथे सकाळी १० वा. या समितीचा जनसंवाद आयोजित करण्यात आला असून या क्षेत्रातील अधिकाधिक घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले आहे.

रब्बी हंगाम 2025-26 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यात आलेल्या समितीत डॉ. जाधव हे अध्यक्ष तर भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ. वामन केंद्रे, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, डॉ. मधुश्री सावजी, डेक्कन महाविद्यालयाच्या मराठी भाषा विज्ञान प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी जोशी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल हे सदस्य आणि समग्र शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव हे सदस्य सचिव आहेत.

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशा प्रकारे लागू करावे या अनुषंगाने समितीने विभागनिहाय भेटी देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजी पुणे विभागाला भेट देणार आहे. यावेळी सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय, खासगी शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सदस्य, राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटना, पालक-शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आदींशी संवाद साधण्याचा साधण्यात येणार आहे, असे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×