Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

वैमनस्यातून फळ विक्रेत्यासह दोघांवर वार

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाला अटक

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून फळ विक्रेत्यासह त्याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसरमधील सय्यदनगर भागात घडली. याप्रकणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाची साडेचार लाखांची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी

हुसेन मुस्तफा कादरी (वय २७, रा. हांडेवाडी रस्ता) आणि त्याचा भाऊ शब्बीर कादरी अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी अमजद अफजल शेख (वय ४५, रा. सय्यदनगर, हडपसर) अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेले साथीदार अकबर अफजल शेख (वय ४०), आयान अमजद शेख (वय २२), मदतसर सलीम शेख ( वय २८), मजहर काजी ( वय २८), अशपाक अफजल शेख (वय २८), जावेद बागवान (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन कादरी हे फळ विक्रेते आहेत. ते घाऊक स्वरुपात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. सय्यदनगर परिसरात त्यांचे गोदाम आहे. आरोपी आणि कादरी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. २६ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास कादरी हे गोदामात निघाले होते. त्यावेळी वाटेत आरोपी अमजद शेख थांबला होता. तेव्हा अमजद याने कादरी यांना अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी कादरी यांचा भाऊ शब्बीर तेथे आला. आरोपी अमजद आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार तेथे आले. त्यांच्या काठ्या, पाईप, तसेच तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींना पाहताच कादरी आणि त्यांचा भाऊ तेथून पळाले. त्यांनी गोदमाचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला.
अमजद याने कादरी यांच्या हातावर वार केला. टोळक्याने कादरी आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×