पुणे जिल्हा परिषदेतील प्रशासन अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या ताब्यात

Pune ACB trap

शिक्षण सेवकाकडून घेतली पावणेतीन लाखांची लाच

marathinews24.com

पुणे – पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडून पावणेतीन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये वानवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा; हॉटेल मालक, मॅनेजर, वेटरसह ७ जणांवर गुन्हा – सविस्तर बातमी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२), कनिष्ठ सहायक अनिल पोपट रंधवे (वय ३२), आतिश कैरू शिंदे (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षण सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

उपशिक्षकपदी पदोन्नतीसाठी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वेल्हे यांच्यामार्फत शिक्षण सेवकाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी खंदारे यांची त्यांनी भेट घेतली. जातवैधता प्रमाणपत्र नसले तरी अनुकुल प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे सांगून खंदारे यांनी त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर खंदारे, रंधवे, शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून २५ हजार घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. उर्वरित पावणेतीन लाख रुपये घेऊन तक्रारदाराला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील माॅलसमोर बोलाविण्यात आले. सोमवारी (६ एप्रिल) सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या रंधवे आणि शिंदे यांना पकडण्यात आले.

खंदारे, रंधवे आणि शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी ही कारवाई केली. सहायक आयुक्त नीता मिसाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×