Breking News
मित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटकपालखी सोहळ्यानिमित्त वाहतूकीत बदल, साडेसहा हजारांचा पोलीस बंदोबस्तपालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजनसंतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअर्थमंत्र्यांकडून महाज्योतीला दुय्यम वागणूक-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोपओैंधमधील वस्त्रदालनातून कपडे चोरीलामौजमजेसाठी दुचाकी चोरणारा तरुण अटकेत

वैमनस्यातून दोन तरूणांवर कोयत्याने वार

वैमनस्यातून दोन तरूणांवर कोयत्याने वार

टोळक्याविरुद्ध गुन्हा, सातारा रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दोन तरूणांवर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव नाईकनवरे (वय १७, रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी), कार्तिक गायकवाड (वय १६, रा. संभाजीनगर, धनकवडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. शीतल सचिन नाईकनवरे (वय ४०) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडीत शिवशाही बसचा अपघात; चालकासह प्रवासी जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकनवरेचा शंकरमहाराज वसाहत परिसरातील काहीजणांशी वाद झाला होता. नाईकनवरे आणि गायकवाड हे सोमवारी (१६ जून) रात्री पावणेअकराच्या सुमारास कामावरुन घरी निघाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर कमानीजवळ टोळक्याने त्यांना अडविले. नाईकनवरे आणि त्याचा मित्र गायकवाड यांच्यावर टोळक्याने कोयत्याने वार केले. टोळक्याने नाईकनवरे याच्या डोक्यात कोयता मारला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top