Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

धनकवडीत शिवशाही बसचा अपघात; चालकासह प्रवासी जखमी

धनकवडीत शिवशाही बसचा अपघात; चालकासह प्रवासी जखमी

डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्यात थांबलेल्या डंपरवर शिवशाही बस आदळून चालकासह वाहक, तसेच दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात घडली. डंपर रस्त्याच्या कडेला थांबवून अपघातास जबाबदार असल्याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दीपक प्रकाश माने (वय ४९, रा. गुंडेवाडी, मिरज, जि. सांगली) असे जखमी झालेल्या शिवशाही बसचालकाचे नाव आहे. याबाबत माने यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ वादातून केला मित्राचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज ते स्वारगेट या मार्गावरील शिवशाही बस मंगळवारी (१७ जून) दुपारी एकच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन स्वारगेट स्थानकाकडे निघाली होती. शंकरमहाराज मठासमोर डंपरचालकाने बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेला डंपर थांबविला. त्यावेळी पाठीमागून शिवशाही बस डंपरवर आदळली.

अपघातात शिवशाही बसचालक माने यांच्यास वाहक, दोन प्रवासी जखमी झाले. अपघातात शिवशाही बसचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी घटनास्थळी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×