जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने आयोजन; १६ दिवसांत करणार ३५० किलोमीटरचा प्रवास
marathinews24.com
पुणे – जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धनासाठी पुण्यातून ‘वसुंधरा पायी दिंडी’ श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने निघाली. हजारो धामयात्री पर्यावरण जागृतीच्या या मोहिमेत सहभागी झाले. मुख्य पीठ नाणीजधाम पश्चिम महाराष्ट्र पुणेच्या वतीने या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. पीठाचे प्रमुख संजय गाडेकर, वसुंधरा पायी दिंडी प्रशासनाचे अध्यक्ष व प्रवक्ता प्रवीण ठाकूर, सहपीठप्रमुख कमलाकर हजारे उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन – सविस्तर बातमी
पुण्यासह महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, परभणी, मुंबई, तर तेलंगणा व गोव्यातून दोन अशा सात ठिकाणहून या दिंडी निघाल्या आहेत. पुण्यातून निघालेल्या या दिंडीमध्ये जवळपास ६५० भक्तगण सहभागी झाले आहेत. पुणे ते नाणीजधाम असा ३५० किलोमीटरचा प्रवास ते १६ दिवसांत करणार आहेत. पायी प्रवासात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. या सर्व दिंड्या २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे एकत्र येणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा जन्मोत्सव असून, या नाणीजधाम येथील आश्रमात भजन, किर्तन, महाप्रसाद अशा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येतो. जागतिक तापमानवाढ रोखण्यासह झाडे लावण्याचा संदेश देणारे पोशाख, हातात फलक घेऊन सिद्ध पादुकांच्या सान्निध्यात ही वसुंधरा दिंडी निघाली आहे.























