Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण

किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण

लोणी काळभोर परिसरात घडली घटना 

marathinews24.com

पुणे – किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्यची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाजी विक्रेता अक्षय अशोक चव्हाण (वय ३४, रा. जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाजीपाला विक्रेत्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात ते भाजी विक्री करतात. आरोपी भाजीपाला विक्री करतो. तक्रारदार भाजीपाला विक्रेत्याचे काका कडीपत्ता विक्री करतात. चव्हाण याच्या काकांनी आरोपीला कडीपत्याचे पाच बंडल देण्यास सांगितले होते. आरोपीने त्यांच्याकडे आणखी सात बंडल मागितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. चव्हाण आणि त्यांचा चुलतभाऊ प्रशांत यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चव्हाण यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांना बांबूने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×