Breking News
गाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पुण्यात आरएसएसच्या ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधवयांचे आदेश

marathinews24.com

पुणे – वाहतूक पोलिसांकडून शनिवार पेठेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या मोतीबाग परिसरात दुचाकी, तसेच चारचाकी वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

प्रजासत्ताक दिनी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन – सविस्तर बातमी

शनिवार पेठेतील मोतीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देतात, तसेच तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे वास्तव्य असते. मोतीबाग परिसरातील अरुंद गल्लीत दुचाकी वाहने लावण्यात येतात. या परिसरात अहिल्यादेवी प्रशाला आहे. अरुंद गल्लीत दुचाकी, तसेच चारचाकी वाहने लावण्यात आल्याने अडथळा होता. यापार्श्वभूमीवर मोतीबागेतील नाट्यछटाकार दिवाकर रस्त्यावरील हाॅटेल रामकृष्ण ते मोतीबाग दरम्यान दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. विश्वलिला इमारत ते मोतीबागपर्यंत दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.

नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक शाखा कार्यालय, गोल्फ क्लब रस्ता (लोहगाव विमानतळ रस्ता), बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कार्यालय येथे ९ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पोलीस उपायुक्त जाधव यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×