पोलीस आयुक्त अमितेशकुमार
marathinews24.com
पुणे – दरवर्षी टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला होणाऱ्या विलंबच्या प्रश्नावर टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीने पुढाकार घेत प्रथमच स्वयंस्फूर्तीने बैठक बोलावली होती या बैठकीत विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडचणींविषयी कार्यकर्त्यानी आपली भूमिका मांडली त्याला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या अडचणी येत आहेत त्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले या वेळी खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
‘संगीतसंध्या’ मैफलीत दमदार तबलावादन आणि आश्वासक गायनाचा आविष्कार – सविस्तर बातमी
1. अभिनव चौकात (पुरम चौक ) होणारी गणेश मंडळांची कोंडी सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमणे अधिक परिणामकारक होईल व जेणेकरून गणेश मंडळे लवकर पुढे सरकतील व विसर्जन मिरवणुक लवकर संपन्न होण्यास गती प्राप्त होईल.
2. सातारा रोड कडून, शिवाजी रोड कडून व अन्य चौकांमधून स्वारगेट – जेधे चौकातून टिळकरोड मार्गाला लागणारी व तसेच बाजीराव रोड कडून, अदमबाग मस्जिद रोड कडून व अन्य चौकांमधून अभिनव चौक (पुरम चौक) येणाऱ्या गणेश मंडळांना टिळकरोड मार्गाने जाण्यासाठी प्रथम प्राधान्य प्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सोडण्यात यावे.
3. अभिनव चौक (पुरम चौक) येथे सीलाई शॉप शेजारी सीसीटिव्ही यंत्रणेचा खांब अत्यंत कमी उंचीवर असून व त्यालाच लागुन असणारा दुभाजक यामुळे गणेश मंडळांच्या विसर्जन रथाला अडथळा निर्माण होत असल्याने यावर योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
4. टिळकरोड मार्गावरील गणेश मंडळांसाठी स्वतंत्र विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात यावी. कारण अलका टॉकीज चौकात गणेश मंडळांचे मिरवणुक रथ थांबवून बाप्पांचे विसर्जन करण्यास जास्तीचे अंतर चालत जाऊन करावे लागते. लकडी पुल, विट्ठल मंदिर किंवा भारती भवन येथे नियोजन झाल्यास मिरवणुकांना गती प्राप्त होऊन नागरिकांची गर्दीही टळेल व गणेश विसर्जन सुरळीत पार पडेल.
5. लक्ष्मीरोडच्या धर्तीवर स्वारगेट – जेधे चौक ते अलका टॉकीज चौक यादरम्यान टिळक रोडच्या संपूर्ण मार्गाच्या दुहेरी बाजूने योग्य पद्धतीने सर्वेक्षण करुन मजबूत लोखंडी बॅरिगेट्सची कायमस्वरूपी उभारणी करण्यात यावी. यामुळे पादचारी नागरिकांचे येणे – जाणे शिस्तबद्ध, नियोजनबध्द व गर्दी न होण्यास संपूर्ण अटकाव होईल.
6. अलका टॉकीज चौकामध्ये उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाठ ही टिळक रोड कडून येणाऱ्या रस्त्याकडे असते. याची दखल घेऊन योग्य नियोजन करत पुणे महानगरपालिकेमार्फत स्वागत कक्ष उभारण्यात यावा.
7. अलका टॉकीज चौकमध्ये गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींची सांगता झाल्यानंतर टिळकरोड मार्गासंपल्यानंतर डाव्याबाजूने लाल बहादुर शास्त्री रोड ते दांडेकर पुल ते सारसबाग चौक यादरम्यान परतीच्या मार्गावरती दुचाकी, चारचाकी, रिक्षा व इतर अनेक वाहनांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात होत असल्याने व यासाठी कोणतेही नियोजन नसल्याकारणाने गणेश मंडळांचे विसर्जन रथ पुढे जाण्यास अडथळा निर्माण होऊन वेळेचा विलंब होत असल्याने टिळकरोड मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची व गणेश मंडळांची कोंडी होत आहे. यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
8. टिळक रोडवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. विशेषतः महिला सुरक्षेवरती अधिक भर द्यावा, ही विनंती.
9. स्वारगेट – जेधे चौक ते अलका टॉकीज चौक यादरम्यान टिळक रोड रस्त्याच्या आजुबाजुला मुबलक स्वरूपात सोयीसुविधा युक्त मोबाईल टॉयलेट अर्थात सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता… विशेषतः महिलांसाठी प्राधान्याने.
10. टिळक रोड स्वारगेट – जेधे चौक ते अलका टॉकीज चौक या मार्गा दरम्यान मोकळ्या जागांचा किंवा पुणे मनपाच्या जागांचा वापर करून फूड झोन तयार करण्यात याव्यात. जेणेकरून यामुळे टिळक रोड मार्गावरील फुटपाथ पदचारी नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहतील व गर्दी टाळण्यास अधिक मदत होईल. तरी याविषयी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
11. गणेशोत्सवाच्या विसर्जन दिवशी दारू विक्री बंदी असून देखील त्यादिवशी प्रत्यक्ष टिळकरोडच्या आजुबाजुच्या ठिकाणीच अनाधिकृतरित्या दारूविक्री होत असल्याचे आढळून येत असून यावर प्रकर्षाने कठोर कारवाई करण्यात यावी.
12. टिळक रोड मार्ग स्वारगेट – जेधे चौक , हिराबाग चौक, अभिनव चौक (पुरम चौक), एस.पी कॉलेज चौक, न्यू इंग्लिश स्कुल चौक, अलका टॉकीज चौक, महत्वपूर्ण ठिकाणी व चौकांमध्ये योग्य प्रमाणातील प्रकाश व्यवस्था उभारण्यात यावी.
13. विविध मंडळांवर दाखल असलेले खटले मागे घेण्यात यावेत, कारण गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, परिमंडल १ चे उपायुक्त ऋषिकेश रावले, परिमंडल २ चे उपायुक्त मिलिंद मोहिते परिमंडल ३ चे उपायुक्त संभाजी कदम वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर ग्राहक पेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे विघ्नहर्ता न्यास चे विश्वस्त डॉक्टर मिलिंद भोई प्रवीण चोरबेले राजाभाऊ कदम हे उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीचे अमित बागुल, पुष्कर तुळजापूरकर, गणेश घोष, उमेश वैद्य, सुधीर ढमाले, सागर बागुल, ऋषिकेश भुजबळ, विनायक धारणे, मनीषा धारणे यांनी केले.