Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे प्रेस क्लबच्या उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

पुणे प्रेस क्लबच्या उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

marathinews24.com

नागपूर – पुणे पत्रकार प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या जागेमध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त असे सर्वोत्तम संकुल उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मोबाईलचा वापर कमी करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ – सविस्तर बातमी 

राज्य सरकारने पुणे पत्रकार प्रतिष्ठानला सेनापती बापट रस्त्यावर आठ हजार चौरस फुटाची जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे. ही जागा प्रतिष्ठान कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने ही जागा दिल्याबद्दल पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे देखील आभार मानण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सांडभोर, खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त विठ्ठल जाधव, संघाचे सदस्य विजय चव्हाण, प्रशांत आहेर, वैभव सोनवणे, ज्ञानेश्वर चौतमल, योगेश बोरसे, दिलीप राणे आदी उपस्थित होते.

नागपूर अधिवेशनामध्ये पुण्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, “नागपूर येथील प्रेस क्लबच्या इमारतींचा पुनर्विकास करत आहोत. त्याच धर्तीवर पुण्यामध्ये अतिशय सुसज्ज अत्याधुनिक इमारत उभा केली जाईल. त्याचा उपयोग पत्रकारांचे क्षमता वृद्धी, कौशल्य विकसन आणि मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो.” उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, बावनकुळे यांनीही या प्रकल्पासाठी मदत केली जाईल अशी आश्वासन दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×