पुण्यात धावत्या कारमध्ये वकिल महिलेवर अत्याचार

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

कोरेगाव पार्क परिसरातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यस्था बिघडलेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी तरूणाने धावत्या मोटारीत एका वकिल महिलेवर अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, महिलांसह तरूणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे.

तडीपार गुंड टोळीची लोणी काळभोरमध्ये पुन्हा दहशत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वकिल असून, रविवारी रात्री ती एका पबमध्ये रात्री गेली होती. त्याठिकाणी तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तिला घरी सोडतो, असे सांगितले. आरोपीने तिला विश्वासात घेत प्रवासाला सुरूवात केली. त्याने महिलेला मोटारीतून घेउन मुंढवा-कोरेगाव पार्क रस्त्याने मार्गक्रमण सुरू केले. दरम्यान, काही अंतरावर रस्ता निमर्नुष्य असलेल्या ठिकाणी त्याने कडेला मोटार उभी केली. त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. महिलेने आरडाओरड न करण्याची धमकी त्याने दिली होती.

याप्रकरणी महिलेने रात्री उशिरा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेउन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेचा जबाब नोंदवून घेतला आहे. तिने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी कोरेगाव पार्क- मुंढवा रस्त्यावरील पब, तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, आरोपीच्या शोधार्थ पोलीस कार्यरत असल्याचे कोरेगाव पार्क पोलिसांनी सांगितले आहे.

अल्पवयीन मुलींच्या विनयभंगानंतर महिलेवर अत्याचार

नसरापूर, पर्वतीसह शहरातील विविध भागात अल्पवयीन मुलींच्या विनयभंगासह अत्याच्याराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता धावत्या मोटारीत वकिल महिलेवर अत्याचाराच्या घटनेने महिलांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पुणे शहराचा दावा करणारे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×