Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

जीपच्या धडकेत दुचाकवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू

Tractor Accident

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी जीप चालकाला अटक केली. प्रतिभा दत्तात्रय घडशी (वय ५५, रा. धबाडी, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार महिला मंगला अशोक काकडे (वय ६०, रा. श्री दत्त संस्कृती रेसीडन्सी, धबाडी) जखमी झाल्या. याप्रकरणी जीपचालक राजकुमार ज्ञानेबा राजपंगे (वय ३८, रा. श्री भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. मंगला काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरात दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मंगला काकडे आणि त्यांची मैत्री प्रतिभा या वडगाव बुद्रुकमधील धबाडी रस्त्याने ७ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निघाल्या होत्या. चरवड बंगल्यासमोर भरधाव जीपने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी घडशी यांना गंभीर दुखापत झाली. भरधाव जीपने तेथून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोन दुचाकींचे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या घडशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर जीपचालक राजपंगे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक साळुंके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×