Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेला मदत केली नाही

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

‘माॅल’ प्रशासनाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – माॅलमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी गणेशखिंड रस्त्यावरील संबंधित माॅलच्या प्रशासनाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५७ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माॅलचे प्रशासकीय अधिकारी, तसेच लिफ्टची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूखाली दबून बालकाचा मृत्यू;डंपर चालकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवाजीनगर भागात राहायला आहेत. दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी त्या गणेशखिंड रस्त्यावरील एका माॅलमध्ये गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर दोन नातेवाईकही होते. लिफ्टमधून जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. महिला आणि नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले. त्यांनी लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेबरोबर असलेल्या एका नातेवाईकाने लिफ्टच्या काचेवर हात मारला. काचेचा तुकडा उडल्याने महिलेच्या कपाळाला जखम झाली.

महिला जखमी झाल्यानंतर लिफ्टची देखभाल करणारे कर्मचारी आणि माॅलच्या प्रशासन विभागातील अधिकारी, कर्मचारी तेथे आले नाही, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. निष्काळजीपणा, तसेच हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×