Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

नऱ्हे येथे योगेश कदमांची जोरदार सभा; पुणे महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे केले आवाहन

नऱ्हे येथे योगेश कदमांची जोरदार सभा; पुणे महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे केले आवाहन

पुणेकरांना पाणी व शेतीसाठी स्वतंत्र धरणे हवीत: डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रचारार्थ नऱ्हे-वडगाव बु.-धायरी आणि येरवडा-गांधीनगर भागात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कदम यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत भगवा फडकविण्याचे आवाहन केले.

‘मॉडेल महिला-स्नेही ग्रामपंचायतींच्या सर्वोत्तम पद्धती’ राष्ट्रीय कार्यशाळेचा यशदा येथे शुभारंभ – सविस्तर बातमी 

प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बु.-धायरीमध्ये शिवसेना उमेदवार गिरमे निलेश दशरथ, गिरमे राधिका दशरथ, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि तांबे विठ्ठल ज्ञानेश्वर यांच्या प्रचारासाठी ७ जानेवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील कालभैरव मंदिर चौक, नऱ्हे रोड येथे सभा झाली. तसेच प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगरमध्ये उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, वाघचौरे कोमल अभिजीत, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारार्थ गाडीतळ येरवडा येथे ही सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, उपनेते इरफानभाई सैय्यद, निलेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, समाविष्ट गावे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमी सामान्य लोकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना या गावांच्या विकासासाठी महापालिकेत पाठवणे गरजेचे आहे. नगर विकास खात्यासह महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल. सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून पुणे महापालिकेत भगवा फडकवा, असे आवाहन कदम यांनी केले.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नऱ्हे गावातील पाण्याच्या पाईपलाइनसाठी मी निधी दिला होता, त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. आता फिल्टरची मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. समाविष्ट गावांच्या करमाफीचा मुद्दा मांडला आहे, मात्र प्रशासकामुळे दुर्लक्ष झाले आहे. नवे पोलीस स्टेशन योगेश कदम यांच्यामुळे सुरू झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवसेंदिवस पुण्याला पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे, त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे गरजेचे आहे. ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×