Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

कंपनीत गुंतवणूकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता भागात राहायला आहे.

कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक काम ऑनलाइन पद्धतीने करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी सांगितले. प्रत्यक्षात चोरट्यांनी तरुणाच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला पैस गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी २ लाख ७१ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

सायबर चोरट्यांकडून तरुणीची ३ लाखांची फसवणूक

पुणे- क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील एका तरुणीची दोन लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडीट कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी तरुणीच्या खात्यातून पैसे काढून घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×