पुण्यातील संगमवाडी रस्त्यावरील घटना
marathinews24.com
पुणे – रस्त्यावर किरकोळ अपघात झाल्यानंतर वादविवादातून कारचालक महिलेने तरुणाला मोटारीच्या बोनेटवरून तबल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना शनिवारी ( दि. १७) संगमवाडी रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी चालक महिलेला अटक करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
डॉक्टरचा सारथीच निघाला अपहरणकर्ता – सविस्तर बातमी
मेरसेदे रसुलीफर (वय ४५) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. घटनेत राम लक्ष्मण राठोड (वय ३४) जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरसेदे कारने संगमवाडी पुलाकडे जात होत्या. त्यावेळी इनोव्हा कारचालक राम यांच्यात किरकोळ कारणावरून वादविवाद झाला. हा वाद झाल्यानंतर रामने गाडी बाजूला घेत मेरसेदे यांच्या गाडीसमोर जाऊन त्यांना बाहेर येण्यास सांगितले. पण त्या कारच्या बाहेर आल्या नाही. त्यांनी कार सुरु करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, राम समोरच उभा राहिला. तरीही त्यांनी गाडी थांबवली नाही. राम याने बोनेटला धरले, तेव्हाही त्यानी कार भरधाव चालवत रामला दोन किलोमीटर फरफटत नेले. त्यामुळे राम जखमी झाला असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.




















