Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

तरुणाला ट्रेडींग करणे भोवले, १० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये ट्रेडींगचे आमिष तरूणाच्या अंगलट आले असून, सायबर चोरट्यांनी त्यांची १० लाख ८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १ ते ७ डिसेंबर २०२५ कालावधीत विमाननगरात घडली आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर परिसरात घरफोडी; कुलूप तोडून दागिने लांबविले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विमाननगरमधील क्लोअर पार्कमध्ये राहायला असून, १ ते ७ डिसेंबर २०२५ कालावधीत सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानुसार संबंधिताने बँकखात्यात रक्कम वर्ग करण्यास सुरूवात केली. अवघ्या ७ दिवसांत १० लाख ८ हजार रूपये ऑनलाईनरित्या स्वीकारून सायबर चोरट्यांनी तरूणाला गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश बोलके तपास करीत आहेत.

बाणेर-बालेवाडीतील एकाला ७ लाखांचा गंडा

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतल्यानंतर सायबर चोरट्यांनी एकाला शेअरमधील गुंतवणूकीच्या बहाण्याने ऑनलाईनरित्या ७ लाख २२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ११ जुलै ते २९ ऑक्टोबर २०२५ कालावधीत बाणेर-बालेवाडीत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×