Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यश रवी उन्नीतन (वय २०, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत यशने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

याप्रकरणी ईश्वर नरुटे, इशान मोरेरा यांच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश याचा आरोपींशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. शनिवारी (४ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास यश बी. टी. कवडे रस्त्याने निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला अडवले. त्याला शिवीगाळ करून बॅटने मारहाण केली. मारहाणीत तो जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×