Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ऑनलाइन गेमच्या आमिषाने तरुणाची ३६ लाखांची फसवणूक

ऑनलाइन गेमच्या आमिषाने तरुणाची ३६ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाइन गेमच्या नादात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत व्यावसायिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तरुण वाघोली भागातील एका सोसायटीत राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठविली. ऑनलाइन गेम खेळल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केले. गेल्या आठ महिन्यात तरुणाने ऑनलाइन गेमच्या नादात ३६ लाख ७४ हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

ऑनलाइन गेमच्या नादात अनेक तरुणांनी पैसे गमावले आहेत. ऑनलाइन गेमच्या आहारी शाळकरी मुले गेल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी शिरूरमधील एका शाळकरी मुलाची ऑनलाइन गेमच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली होती. ऑनलाइन गेमचे आमिष दाखविणाऱ्या जाहिराती, तसेच लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×