Breking News
Constitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूक

पुण्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चौघांना अटक

Fursungi Murder Case

जुन्या भांडणाचा राग जीवावर; धारदार शस्त्राने हल्ल्यात तेजस पिलाणेचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून टोळक्याने तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तेजस दत्तात्रय पिलाणे (वय २४, रा. पार्थदर्शन सोसायटी, मोहननगर, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २५ एप्रिलला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शिवसृष्टी गदा चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर घडली आहे.

चालकाने लांबवले १५ लाखांचे दागिने, आरोपीला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तेजस पिलाणे याच्या चेहऱ्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी विशाल दत्तात्रय खोपडे (वय २२), अभिषेक दिलीप खोपडे (वय २३), सचिन हिराचंद्र धुळे (वय ४३) आदिनाथ शिवाजी कासबे (वय १९ सर्व रा. आंबेगाव व मंगळेवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×