Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

“आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे…” – आंदेकर कुटुंबातील मुलींची भावना

“आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे…” - आंदेकर कुटुंबातील मुलींची भावना

विरोधक काहीही बोलत असले तरी प्रभागात आंदेकरांचे काम बोलते; कामाची पोचपावती म्हणून आजितदादांनी कुटुंबीयांना पुन्हा उमेदवारी दिली

marathinews24.com

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ  मधील उमेदवारीवरून मोठी चर्चा सुरू आहे.  बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी कॉँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबीय भावनिक झाले असून, “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी आर्त भावना आंदेकर कुटुंबातील मुली, महिलांनी व्यक्त केली आहे.

लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार – सनी निम्हण – सविस्तर बातमी 

राष्ट्रवादी काँग्रेस  कडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी देण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने  प्रभाग क्रमांक २३ मध्ये रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करत आहेत. पत्रकार परिषदेला आंदेकर कुटुंबियांसाह प्रभाग 23 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत कोठावले, खान शहाबाज महमंद  शरीफ आदि उपस्थित होते.

प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या, “आम्ही जिथे जातो तिथे लोक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे.”

रिया आंदेकर भावना व्यक्त करत म्हणाल्या, “लहानपणी मी वडिलांचा प्रचार पाहिला आहे. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आम्हाला पूर्ण करायची आहेत. जे काही घडले, त्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आता हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. सध्या मी आणि माझी लहान बहीण एकट्याच राहत आहोत,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.

प्रियांका आंदेकर म्हणाल्या, ”प्रचारात आम्हाला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या कामाची मतदार आठवण काढतात याच कामाची पोचपावती म्हणून आजितदादांनी कुटुंबीयांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. विरोधक काहीही बोलत असले तरी प्रभागात आंदेकरांचे काम बोलते, हे वास्तव आहे. ”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×