पाषाणमधील शासकीय इमारतीच्या आवारातून चंदनाची चोरी

पाषाणमधील शासकीय इमारतीच्या आवारातून चंदनाची चोरी

शासकीय लेखन साम्रगी भांडार पंचवटी परिसरात घटना 

marathinews24.com

पुणे – शासकीय इमारतीच्या आवारातून चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीच्या चंदनाची चोरी केली आहे. ही घटना २६ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास पाषाणमधील शासकीय लेखन साम्रगी भांडार पंचवटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक मंगेश शिखरे (वय ३६, रा. पर्वती दर्शन ) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात १ लाखांचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मंगेश शिखरे हे पाषाणमधील शासकीय लेखन साम्रगी भांडार पंचवटी परिसरात सुरक्षारक्षक आहेत. २६ मे रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भांडार परिसरात प्रवेश करून १२ हजार रूपये किंमतीची चंदनाचे झाड कापून नेले. दुसर्‍या दिवशी शिखरे यांना चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार वाघवले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×