Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

घरून काम करण्याचे आमिष पडले १७ लाखांना

घरून काम करण्याचे आमिष पडले १७ लाखांना

काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ४० वर्षीय महिलेला १६ लाख ८४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ ते ३१ जुलै कालावधीत काळेपडळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

३ जिल्ह्यात माजविली दहशत, टोळीविरूद्ध मोक्का – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला काळेपडळ परिसरात राहायला असून, १७ जुलैला सायबर चोरट्यांनी महिलेला वर्क फ्रॉम होम अशा स्वरूपाचा मेसेज केला. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला टेलीग्राम आयडीवरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. १७ ते ३१ जुलै कालावधीत अवघ्या १५ दिवसांत चोरट्यांनी महिलेला १७ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना घरून काम न देता फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.

चांगला परतावा देण्याच्या आमिषाने १२ लाखांना गंडा

गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १२ लाख ५७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२४ कालावधीत घोरपडीत घडली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडीत राहायला असून, २५ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क करून गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी टेलीग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेत विविध फायद्याची गणिते दर्शविण्यात आली. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. १२ लाख ५७ हजार रूपये गुंतवणूक करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×