Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शिक्षण उपनिरीक्षकाकडे सापडले १ लाख २० हजार रुपये

शिक्षण उपनिरीक्षकाकडे सापडले १ लाख २० हजार रुपये

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विना वेतन काम करणाऱ्या शिक्षिकेचा ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाच्या बॅगेतून १ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अटक करताना त्यांची तपासणी केली असता पोलिसांना ही रक्कम आढळून आली आहे.

रिक्षा प्रवासात महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. हडपसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. २५) अटक केली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या पत्नी सोलापूर जिल्ह्यात सहशिक्षिका म्हणून २०१६ पासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ‘शालार्थ आयडी’ नसल्याने विना वेतन काम करत आहेत. ‘शालार्थ आयडी’ मंजूर झाल्यानंतर त्यांचे वेतन सुरू होणार होते. त्यांनी आयडी मंजुरीसाठीचा प्रस्ताव १६ जून रोजी पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयात दाखल केला होता. तो ‘ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे मंजूर करण्यासाठी मिरगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

२९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

मिरगणे यांना बुधवारी (ता. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते. मिरगणे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून याबाबतचे संभाषण शासकीय व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकार्ड झालेले आहे, अशी माहिती साहाय्यक पोलिस आयुक्त सतीश वाळके यांनी न्यायालयास दिली. आवाजाचा नमुना घेण्यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीस तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केला. मिरगणे यांच्यावतीने ॲड. मिलिंद पवार यांनी बाजू मांडली. आवाजाचा नमुना घेण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असा बचाव त्यांनी केला. विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत मिरगणे यांना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×