सिंहगड रस्ता भागात १२ ते १५ वाहनांची केली तोडफोड

सिंहगड रस्ता भागात १२ ते १५ वाहनांची केली तोडफोड

सर्वसामान्यन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनाची तोडफोड करत टोळक्याचा राडा

marathinews24.com

पुणे – शहरातील कोयता गँगचे वर्चस्व कमी होत नसतानाच विविध भागातील टोळक्याकडून सर्वसामान्यन नागरिकांमध्ये दहशतीसाठी वाहनांची तोडफोड केली जात आहे. अशीच घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली असून, वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून गाड्यांची तोडफोड केल्याची घटना वडगाव बुद्रुक भागात घडली. टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी केला गोळीबाराचा प्लॅन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकार्‍याची पोलखोल – सविस्तर बातमी

साई पांडुरंग उमाप (वय १८, रा. समर्थनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमाप आणि तरुणाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रारदार तरुण वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर भागात थांबला होता. त्यावेळी उमाप आणि त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार तेथे आले. त्यांनी तरुणाला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. परिसरातील दुचाकींसह वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली. जवळपास १२ ते १५ वाहनांची तोडफोड केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करत आहेत. दरम्यान, शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. आठवड्यापूर्वी बिबवेवाडीतील पद्मावतीनगर भागात टोळक्याने दहशत माजवून १० ते १५ वाहनांची तोडफोड केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×