Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी केला गोळीबाराचा प्लॅन

पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवान्यासाठी केला गोळीबाराचा प्लॅन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकार्‍याची पोलखोल – वारजे माळवाडीत १९ मेला, रात्रीची घटना होती घटना

marathinews24.com

पुणे – पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या युवा सेना जिल्हाध्यक्षाने चक्क स्वतःच्या मोटारीवर गोळ्या झाडल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ही घटना १९ मे रोजी बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात घडली होती. याप्रकरणी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहेत. निलेश राजेंद्र घारे असे गोळीबाराचा प्लॅन केलेल्या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे.

भामा आसखेड धरणाजवळ मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज पडून मृत्यू – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञाताने १९ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास वारजे माळवाडी भागात गोळीबार केला होता. घारे यांचे येथील गणपती माथा परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय असून, ते कार्यालयात सहकार्‍यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. सुदैवाने घारे हे गाडीत नसल्याने त्यांना दुखापत झाली नव्हती. याप्रकरणी वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकांनी तपासाला गती दिली. रविवारी (दि. २५) रात्री उशिरा वारजे पोलिसांनी वारजे भागातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हा सगळा प्रकार घडवून आणल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे निलेश घारे यांनीच गोळीबार करायला लावल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.

घारे यांनी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. मात्र, तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा तसेच जिल्हाध्यक्ष असल्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे. स्वत: निलेश घारे यांनी स्वतःच्या गाडीवर गोळीबाराचा डाव रचल्याची माहिती पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. पोलिस संरक्षण मिळावे आणि शस्त्र परवाना मिळावा यासाठी स्वतःच्या गाडीवर त्यांनीच गोळीबार घडवून आणला होता. घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×