Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

भामा आसखेड धरणाजवळ मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज पडून मृत्यू

भामा आसखेड धरणाच्या काठावर पडली वीज-तरुणाचा जागीच मृत्यू 

marathinews24.com

पुणे– मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि. २६) दुपारी अडीच वाजता पाईट येथील भामा आसखेड धरणाच्या काठावर घडली आहे. संतोष गुलाब खांडवे (वय ३०, रा. वेताळे) असे मृत युवकाचे नाव आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे थैमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी 

खांडवे हे रौंधळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाच्या परिसरात मासेमारी करत असताना अचानक वीज कोसळली. वीज अंगावर पडल्याने त्यांच्या अंगावरील कपडे आणि मोबाईल जळून खाक झाले. डोक्यापासून पायापर्यंत उजवी बाजू पूर्णतः भाजलेली अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मित्रांनी तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला दाखल केले. मात्र प्राथमिक तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

घटनेनंतर पाईट मंडल अधिकारी एम. एस. सुतार, ग्राममहसूल अधिकारी एम. जी. क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी ए. एन. फुलपगर, मा. उपसरपंच जयसिंग दरेकर यांच्यासह दीपक डांगले, अनिल रौंधळ, विपुल खेंगले, कबीर रौंधळ, हरिभाऊ रौंधळ, नवनाथ डांगले आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृत युवकाच्या नातेवाईकांना तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, तसेच पाईट परिसरात किमान पाच किलोमीटर अंतरासाठी वीज प्रतिबंधक टॉवर बसवावेत, अशी मागणी जयसिंग दरेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×