Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पतंग उडविताना तोल जाऊन पडल्याने १२ वर्षांच्या मृत्यू

पतंग उडविताना तोल जाऊन पडल्याने १२ वर्षांच्या मृत्यू

पतंग उडविताना तोल जाऊन पडल्याने १२ वर्षांच्या मृत्य

marathinews24.com

पुणे – पतंग उडविण्यासाठी गेलेला १२ वर्षीय मुलगा इमारतीतील सहाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतील जिन्यास कठडे नव्हते. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन गेमच्या आमिषाने तरुणाची ३६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

श्लोक नितीन बांदल (वय १२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत श्लोकचे मामा अमो्ल सुभाष इंगवले (वय ३५, रा. ओैंदुबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर, महेश धूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरातील एका गृहप्रकल्पाचे सुरू आहे. गृहप्रकल्पाच्या शेजारील सोसायटीत बांदल कुटुंबीय राहायला आहेत. श्लोक पाचवीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत कामाल आहे. गुरुवारी (८ जानेवारी) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक बांधकाम सुुरू असलेल्या इमारतीत पतंग उडविण्यासाठी गेला. सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने श्लोक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट दिली. इमारतीचे काम सुरू असल्याची माहिती चौकशीत मिळाली. इमारतीतील जिन्यांना कठडे नसल्याचे उघडकीस आले. बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×