Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात १५ वाहनांची तोडफोड

पुण्यात १५ वाहनांची तोडफोड

पद्मावती परिसरात टेम्पोसह दुचाकींचे नुकसान

marathinews24.com

पुणे – किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण केली. त्यानंतर बांबू आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (दि. २१) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पद्मावती येथील खंडाळे चौकात घडली आहे. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

डेटींग ॲपवरील ओळखीतून तरुणाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रिस चव्हाण व आरोपीमध्ये वाद होते. क्रिस हा मंगळवारी रात्री कामावरुन घरी आल्यानंतर तिघांनी त्याला अडवले. तेथे बाचाबाची झाल्यानंतर तिघेही क्रिसला मारण्यासाठी धावले. क्रिस त्यांच्या तावडीतून पळून जात असताना टोळक्याने परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दिसेल त्या वाहनांची तोडफोड करत टोळक्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.

स्थानिक नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर सहकारनगर पोलिस व गुन्हे शाखेची पथक घटनास्थळी दाखल झाले. तोडफोड प्रकरणी दिपक कदम याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पराभूत उमेदवाराचे काही कार्यकर्त्यांनी सलग दोन दिवस मोठा जमाव जमा केला होता. त्यामुळे येथे राजकीय वातावरण तंग आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×