Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डेटींग ॲपवरील ओळखीतून तरुणाला लुटले

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डेटींग ॲपवर झालेली ओळखीतून एका तरुणाला बोलावून त्याच्याकडील दागिने आणि रोकड असा ८० हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना कोंढवा घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची १४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय तरुण वाघोली परिसात राहायला आहे. ११ जानेवारीला तो मोबाइलवर डेटींग ॲप पाहत होता. त्यावेळी एकाने त्याला संदेश पाठविला. त्यानंतर तक्रारदार तरुणाने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘कोठे राहतो ?’ अशी विचारणा तरुणाने त्याच्याकडे केली. त्यानंतर आरोपीने रात्री नऊच्या सुमारास कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ तरुणाला भेटायला बोलाविले. त्यावेळी तीन तरुण तेथे थांबले होते. तरुणांनी त्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. कोंढव्यातील पानसरेनगर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाला घेऊन गेले. त्याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याकडील मोबाइल, अंगठी काढून घेतली. तरुणाला धमकावून एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले.

तरुणाकडील रोकड, मोबाइल, अंगठी असा ऐवज काढून घेतला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिघे जण पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष असल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणाने नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शीतल पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×