रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणाची १४ लाखांची फसवणूक

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

जळगावमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जळगावमधील दोघांविरुद्ध लक्ष्मीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सागर दिगंबर पाटील (वय ३५), स्वप्नील मुरलीधर गायकवाड (वय ३३, दोघे रा. तळई, ता. एरंडोल. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोटारीच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. आरोपींशी तरुणाची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. तक्रारदार तरुण आणि त्याच्या पत्नीला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. त्यानंतर आरोपींनी तरुणाकडून वेळोवेळी १९ लाख १५ हजार रुपये घेतले. नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर आरोपींनी त्याला ५ लाख १५ हजार रुपये परत केले. उर्वरित पैसे देतो, असे सांगितले. उर्वरित पैसे देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. त्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×