मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव आयोजित कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग
marathinews24.com
पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित आलेल्या नोकरी महोत्सवत ६५ कंपनी आणि १ हजार ५०० तरुण तरुणीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता . ३०० युवक युवतीना जागेवर जॉब ऑफर लेटर कंपन्यातर्फे देण्यात आले. महोत्सवात सुमारे ६०० युवक युवतीना रोजगार उपलब्ध झाला. नोकरी महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी भाग संचालक किशोर शशितल यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्चं व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आमदार हेमंत रासने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘साहित्य रंग’ भाग – १६, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…- सविस्तर बातमी
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व युवक नेते ऍड कुणाल टिळक यांच्या मार्गदर्शनात नोकरी महोत्सवात चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते युवक युवतीना ऑन दि स्पॉट जॉब ऑफर लेटर्स देण्यात आले. यावेळी मिराताई पावगी, राघवेंद्र मानकर, माजी नगरसेवक अजय खेडेकर,योगेश समेळ, गायत्री खडके, दिलीप काळोखे, आर पी आय युवा नेते मंदार जोशी, करणं मिसाळ, हर्षदा फरांदे, राजेंद्र काकडे अमित कंक, छगन बुलाखे, नामदेव माळवदे श्रीराम नानजकर, विश्वजित देशपांडे, मंदार रेडे, सचिन टापरे, निखिल पंचभाई, केदार मानकर, शंतनू कांबळे, पियुष कश्यप तुषार रायकर, रौनक शेट्टी, रमाकांत कापसे, महेश कुलकर्णी, मनोज खत्री, बाबू खैर, विश्वास घोलप, प्रमोद वसगडेकर, अविनाश आपटे, अश्विनी पवार पदाधिकारी उपस्थित होते.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, युवक युवतीना नोकरीं महोत्सवामार्फत नोकरी मिळवून देण्यासारखं मोठे सामाजिक कार्य नाही. हल्लीच्या काळात शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित भर देऊन कंपनी युवक युवतीना नोकरी देत आहे.आय टी कंपनी, बँकिंग, इन्शुरन्स मॅन्युफॅक्टरिंग सेल्स मार्केटिंग, रिटेल कंपनी, ऍक्सिस बँक, एस बि आय लाईफ इन्शुरन्स, बेलाराईज इंडस्ट्रिज, लोकमान्य मल्टीपरपज कंपनी, पी एन जी एक्सकलूजिव्ह ए बी इन्फोतेक कंपनी आदी नामवंत कंपन्या या नोकरी महोत्सवात सहभागी झाल्या होत्या.





















