Breking News
तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीनगणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण खपवून घेणार नाही – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारावडिलांच्या डोळ्यादेखत शाळकरी मुलगी गेलीअल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमारउच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावाउद्योजकतेला बळ, स्वावलंबनाला दिशा! – विशेष लेखपुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकारपुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या ‘पीएमआरडीए’ला टाळे ठोकण्याची वेळभरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलतरोजगार महाकुंभ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

पुण्यात १७ वर्षीय मुलीने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

नैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्या

वडीलांच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या

marathinews24.com

पुणे – वडिलांच्या त्रासाला कंटाळून मी आत्‍महत्‍या करत आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलीने आत्‍महत्‍या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. संजिवणी जिवन रोडे ( रा. जिजाबाईनगर, नांदेडगाव) असे आत्‍महत्‍या करण्यात आलेल्‍या मुलीचे नाव आहे. जीवन गणपती रोडे (वय ५५) याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची आई शिला जिवन रोडे (वय ५०, रा. जिजाबाईनगर, नांदेडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’ दालनात आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रोडे कुटुंबीय गेल्‍या १० वर्षापासून जिजाबाईनगर येथे राहण्यास आहेत. आरोपी जीवन हा तक्रारदार शिला यांचा पती आहे. त्‍यांना सहा मुले असून तीन मुलींची लग्न झाली असून संजीवणी, तिची मोठी बहीण आणि तिचा ११ वर्षाचा लहान भाऊ हे त्‍याठिकाणी राहण्यास होते. शिला घरकाम करून कटुंबाचा उदनिर्वाह चालत होते.

पती जीवनला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन भांडण व शिवीगाळ करीत होते. तसेच मुलानाही शिवीगाळ करत होते. २९ सप्टेंबरला शिलाला घरकाम करण्यासाठी सकाळी आठ वाजता घराबाहेर पडल्‍या. यावेही पती, दोन मुली आणि मुलगा घरीच होता. त्‍यानंतर त्‍यांची मोठी मुलगी दुपारी तीन वाजता कामावर गेली. दि. २९ सप्टेंबरला शिला कामावर असताना दुपारी साडेपाचच्‍या सुमारास त्यांना फोन आला. त्‍यांनी पत्‍नीला संजिवनीने फाशी घेतल्‍याचे सांगितले. यावेळी मुलीने मृत्‍यूपूर्व चिठ्ठी लिहली होती. त्‍यामध्ये वडीलांच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या करत असल्‍याचे चिठ्ठीत म्‍हटले होते. पुढील तपास नांदेड सिटी पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×