Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

जास्त परताव्याचे आमिष पडले २० लाखांना

महिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकर

सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला २० लाख ६० हजार रुपयांना घातला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअरसह आयपी ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळवून देण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला २० लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना २३ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ कालावधीत पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७३ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी मोबाईल धारक व लिंक धारक तसेच बँकेचे खाते धारक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वानवडीत दुचाकीस्वारांकडून रिक्षा अडवून लुटमार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, दत्तवाडी परिसरात राहण्यास आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला. शेअर व आयपी ट्रेडिंगचमध्ये कमी गुंतवणूक केल्यानंतर जास्त परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केला. सायबर चोरट्याने त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून २० लाख ६० हजार रुपये वर्ग करून घेतले. परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

शेअर गुंतवणूकीवरील चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तब्बल ४५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात ५२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. २ ऑगस्ट २६ सप्टेंबर २०२५ या एका महिन्यात ही फसवणूक झाली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार धायरीत राहण्यास असून, त्यांना शेअर गुंतवणूकीवरील चांगला परतावा देण्याच्या बहाणाकरून पैसे उकळले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद राऊत हे करत आहेत.

बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूक

बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाची साडे तीन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात ६९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार सायबर चोरट्यांविरूद्द गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहत असून, त्यांना सायबर चोरट्यांनी सातत्याने कॉल व मेसेज करून बिल अपडेट करण्यास सांगितले. त्यांना एक एपीके फाईल पाठविली. तक्रारदारांनी ती उघडली असता त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावरून ३ लाख ४४ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×