नागरिकांचे गहाळ झालेले २६ मोबाइल तक्रारदारांना परत

नागरिकांचे गहाळ झालेले २६ मोबाइल तक्रारदारांना परत

डेक्कन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाइल डेक्कन पोलिसांनी शोघ घेतला. पोलिसांनी तक्रारदारांना साडेचार लाख रुपयांचे २६ मोबाइल परत केली. पोलिसांच्या कामगिरीमुळे तक्रारदारांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून ‘सेंट्रल इक्विपमेंट आय़डेंटी रजिस्टर’ (सीईआयआर) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रणालीवर गर्दीच्या भागातून गहाळ झालेले, तसेच चोरीला गेलेल्या मोबाइल तक्रार नोंदविण्यात आली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार – सविस्तर बातमी 

डेक्कन पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाइल तक्रारींची पडताळणी केली. डेक्कन भागातून गहाळ झालेल्या मोबाइलची तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली. त्याद्वारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुुरू केला. गहाळ किंवा चोरलेले मोबाइल परगावात, तसेच परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाइल संच वापरणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून मोबाइल संच डेक्कन पोलीस ठाण्यात परत करावेत, अशी सूचना केली. पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली. गहाळ झालेले २६ मोबाइल परत करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांशी संपर्क साधला. डेक्कन पोलीस ठाण्यात छोटेखानी कार्यक्रमात मोबाइल परत करण्यात आले

तक्रारदारांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक करुन पाेलिसांचे मनोमन आभार मानले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस कर्मचारी उमा पालवे आणि पथकाने ही कामगिरी केली. शिवाजीनगर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाइल शोधून तक्रारदारांना नुकतेच परत केले. नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाइल संचाचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

इथे करा मोबाइल हरविल्याची तक्रार

पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर punepolice.gov.in/lostFoundReg येथे करावी. तक्रार नोंदविताना जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव नोंदवावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा करावी. मोबाइल हरविल्यानंतर तोच मोबाइल क्रमांक वापरावा. नवीन सीमकार्ड सुरू झाल्यानंतर www.ceir.gov.in या संकेतस्थळावर नोंद करावी. त्याची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात आणून द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×